🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा २२२
आपल्याला आपलेपणाचे प्रेम नाही. बायकोत/नवर्यात आपलेपणा असतो तसा भगवंताबद्दल आपलेपणा नाही.
भगवंताच्या प्रेमाला जातीची, वयाची, परिस्थितीची अडचण नाही. आपण प्रेम वाढवीत नाही. अवडंबर वाढवतो. भगवंताच्या प्रेमाविना लिहिणारा,
वाचणारा व ऐकणारा फुकट आहे.
आपण भगवंताची पूजाअर्चा करतो पण तो माझा आहे असे वाटत नाही. भगवंतावर मुलाइतके आपले प्रेम नाही. मुलासारखा भगवंत वाटला पाहिजे.
भगवंताजवळ नेहमी राहणारे त्याच्याहून वेगळे न राहणारे व आमच्या हातात असणारे असे एक नाम च आहे. नामाने भगवंताचा सहवास होतो.
भगवंता करताच नाम घेतले तर त्याच्या सहवासाचे प्रेम येईल.
आशीर्वाद
🌷🌿🌷
☘
श्रीराम समर्थ ☘