🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २१०
आत प्रकाश पडावा वाटतो, प्रचिती मिळावी असे वाटते. आपली मधली अवस्था आहे. साधना आपण चिकाटीने केली पाहिजे.
ज्या परीक्षेची जी पुस्तके (क्षमतेप्रमाणे साधन) आहेत, तीच वाचली पाहिजेत. सतत (नित्यनेम) वाचली पाहिजेत.
त्याच प्रमाणे भगवंताच्या कृपेला योग्य (त्याला आवडेल) तसे सतत वागले पाहिजे, आचरण ठेवले पाहिजे.
स्वतःला सुधारून जग सुधारणे हे विद्वानाचे (ज्ञानी पुरुषाचे) लक्षण आहे.
आमचे अपराध भगवंत विसरतो. तो कृपाळु, विसराळु आहे. पण आम्ही आमचे अपराध विसरत नाही.
आजार आला तरी नामात राहिला तर बाधणार नाही. प्रारब्धाचे भोग टळावे असे म्हणणे अन्यायाचे आहे.
सर्वांना दुसर्यांना उपदेश करता येतो. तो आचरणात आणला तर परमार्थ होतो.
वस्तुशिवाय समाधान मिळेल तर ते केवळ नामानेच.
आशीर्वाद
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment