Showing posts with label भक्त आणि महाराज. Show all posts
Showing posts with label भक्त आणि महाराज. Show all posts

9 Apr 2017

महाराज नेहमी म्हणत मी तुमच्या अंतकाळी जागतो

श्रीराम!
महाराज नेहमी म्हणत मी तुमच्या अंतकाळी जागतो याची एक सत्य कथा श्री पराग दीक्षित यांनी सांगितली आहे.

एक व्यापारी महाराजांना सांगतो मला नाम घेण्यास वेळच नाही माझ्या प्रचंड व्यापामधून मला नाही जमत महाराज त्याला त्याचे सकाळी उठल्यापासून काय काय करतो हे विचारून घेतात आणि म्हणतात आपण लहानपणी विष्णु सहस्त्रनाम म्हणत असत तेच तुम्ही सकाळी अंघोळ करताना पाच मिनिटे घेत चला

तो व्यापारी तो नित्य नियम पाळतो काही दिवसानंतर त्यास ब्रेन हेमरेज होतो बेशुद्ध अवस्थेमध्ये असतात सर्व डॉक्टर उपचार होतात काहीही उपयोग होत नाही डॉक्टरांनी सांगितले आता यांचे काही सांगू शकत नाही दोन तीन दिवस राहू शकतात घरी आणले जाते आणि त्यावेळेस एक वैदू ओरडत असतो कोणत्याही आजारावर जालीम उपाय ते ऐकून घरची मंडळी म्हणतात आपण एवढे उपाय केले काहीच उपयोग नाही हा शेवटचा उपाय करून पाहू त्या वैदू ला बोलवले जाते तो तपासून सांगतो माझ्याकडे एक वनस्पतीची मुळी आहे ती पाण्यामध्ये उकळून त्याने त्यांना अंघोळ घाला काय होईचे असेल ते आत्ताच होईल एकतर वाचतील किंवा त्यावेळेस त्यांचा अंत होईल डॉक्टरांनी तर दोन तीन दिवसच राहिले आहेत असे सांगितले होतेच म्हणून त्यांनी तो उपाय करण्याचे ठरले मुळी पाण्यामध्ये उकळली आणि अंघोळीला सुरुवात केली पहिला तांब्या डोक्यावर ओतल्या ओतल्या त्या व्यापाऱ्याने विष्णु सहस्त्रनाम घेण्यास सुरुवात केली आणि  ते घेतघेतच प्राण सोडले.