🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २११
परमेश्वर प्रयत्नाला मदत देतो. आळशीपणाला नाही.
आपल्याला केव्हाही भोगता येईल असे सुख परमात्मा देईल (त्याकरता भगवंताला आवडेल असे आचरण असावे).
आचरण चांगले असलेला भिकारी चांगला. पण आचरण चांगले नसलेला राजा चांगला नाही.
प्रत्येकाला हवी असणारी गोष्ट सहज असणार नाही. कारण ती परिस्थितीवर अवलंबून आहे. ती स्वाधीन करून करून घ्यावी लागेल.
व्यवहारात सहज रहायला शिकावे. आपले मूळ (सहजपणा) बिघडू देऊ नये.
दुसरा कसा वागतो ते पाहू नये, आपण कसे वागले पाहिजे ते पहावे. सर्वांशी ओळख असावी पण अत्यंत मर्यादेने वागावे.
उपाधीरहित व्हायला कर्तव्य करावे. स्मरण राखावे आणि ते राखायला नाम घ्यावे. नामाला सर्वांनी वाहून घ्यावे.
आशीर्वाद
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment