12 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


     अमृतधारा - २१२


पेढा कसा खावा याला नियम नाही. तसे परमात्मा कसा भजावा यालाही नियम नाही.


जगात भगवंत प्राप्तीची अनेक साधने सांगतात. शरीरात वेगळे अवयव असतात तशी सर्व साधने आहेत. 


पण निष्ठा हृदयासारखी आहे. हृदयाशिवाय अवयव शाबूत असून फुकट (व्यर्थ) होतात. निष्ठा वाढवली पाहिजे.


भगवंत सर्वज्ञ आहे व आम्हाला पाहिजे ते तो पुरवतो. अशी आजची आपली निष्ठा आहे.


आम्हाला भगवंताशिवाय सर्व काही हवे आहे. त्या ऐवजी भगवंत हवासा वाटला पाहिजे. त्याकरता अखंड  स्मरण ठेवावे.


भगवंताचे आपण मनाने थोडे झालो तर किती पटीने तो समाधान देईल. तो परमात्मा तसाच दयाळू आहे.पण आमची निष्ठा नाही.


आमची काय कर्तबगारी आहे म्हणून शरण जाऊ नये? परमात्मा कोणत्या रीतीने आवरता (आपलासा करता) येईल? शरणागती शिवाय नाही.


 "मी भगवंताचा आहे म्हणणे" हा परमार्थ. परमात्मा नाचत पुढे येईल.


 आशीर्वाद

  🌹🌹🌹

No comments: