12 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २१३


राम कर्ता ही भावना ठेवावी. कर्तेपण नको. त्यात खरे बंधन आहे. ते बंधन लटके आहे असा अनुभव येतो.


त्यासाठी तीन गोष्टी लागतात.


☆ सदाचरण व नीती यांचा पाया बळकट असावा.

☆अंतःकरणाची  पवित्रता - प्रपंच सोडणे कठीण म्हणून निस्वार्थता असावी.

☆भगवंताचे अनुसंधान असावे.

भगवंत सुसाध्य व सोपा आहे. म्हणून त्याचा मार्गही एकच आहे. तो म्हणजे नाम. भगवंत कितीही दूर असू दे. त्याचे नाम मुखात असेल तर तो पतंगासारखा जवळ आहे.


काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी एकाच चौकटीतून शिरावे लागते. त्याचप्रमाणे भगवंताचे दर्शन घेण्यासाठी शरणागती हा एकच मार्ग आहे.


शरणागतीला नाम हा एकच उपाय आहे.


  आशीर्वाद

  🌹🌹🌹

No comments: