🌸श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २१४
आपले एक साध्य व त्याला अनुकूल साधन असावे. ते साधन आपल्या स्वाधीन असावे.
ध्येय ठरल्याशिवाय साधन आनंद देणार नाही आणि साधनात आनंद नसेल तर चिकाटी राहणार नाही!
परमार्थात निरनिराळे लोक काहीतरी सांगत असतात. मनुष्याने गोंधळता उपयोगी नाही. लोक गोंधळून टाकतात.
गोंधळाचे कारण नाही. पण अनुभव नाही तेच गोंधळ करतात.
परमार्थ हा सगळ्यांकरता आहे. अडाण्यापासून ते विद्वानापर्यंत व म्हणून तो सोपा असला पाहिजे. पण तो समजून केला तर.
आपले साध्य - आनंद, शांति, समाधान. त्यात मुख्य - आनंद.
आनंदाला कारण नाही. दुःखाला कारण आहे. मग कारण उत्पन्न करून दुःख का करावे?
प्रपंच आनंदरूप करणे हाच परमार्थ.
आशीर्वाद
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment