🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २१५
समाधान कशाने, तर त्याला कारण नाहीच. असमाधानाला कारण आहे. प्रकृती स्वभावतः चांगली. ती बिघडायला कारण लागते. तसे समाधानाचे आहे. समाधान बिघडणे वृत्तीचे मर्म आहे. हे समजले तर परमार्थ तितका अवघड नाही.
असा विचार करायला पाहिजे की अशी कोणती गोष्ट आहे की जी मिळाल्याने अखंड समाधान मिळेल?
प्रत्येकाच्या जीवनाचे ध्येय, प्रत्येकाचा हेतू अखंड समाधान हा आहे. तो हेतू ठरवला पाहिजे.
समाधान ही भगवंताची खूण आहे. भगवंतावाचून ईतरांकरता केले तर व्यवहारिक समाधान मिळेल. पण ते शाश्वत नाही.
समाधानाला तीन गोष्टी हव्या.
१) सदाचरण.
२) अंतःकरणाचे पावित्र्य.
३) अखंड नामस्मरण.
समाधानाला कशाचीही गरज नाही. प्रत्येकाचा प्रयत्न समाधानासाठीच आहे. समाधान अखंड टिकण्याकरता अखंड नाम घ्यावे.
आशीर्वाद
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment