🌸 श्रीराम समर्थ🌸
अमृतधारा - २१६
प्रयत्न करावा पण भगवंत ठेवील तसे रहावे. असे राहील तो परमार्थी खरा व तोच समाधानी होईल. यात जे भूषण आहे ते वैभवात नाही.
वैभव मिळाले तरी भुलू नये. कमी जास्त गोष्टींचा परिणाम होऊ देऊ नये.
प्रयत्न करावा पण जे फळ समाधान बिघडवते ते भगवंतावर सोपवावे. फळाची अपेक्षा ठेवली हेच कारण निर्माण करणे आहे.
समाधानाला कारण निर्माण करणे दुःखाचे होते. आपण कारणामागे जाता उपयोगी नाही.
समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.
प्रयत्नानंतर फळ आले वा न आले दोन्ही वाहवा.
फळाला जास्त महत्व दिले म्हणून समाधान बिघडले.
आपले खरे काम भगवंत मिळवणे आहे आणि त्यासाठी नामस्मरण पाहिजे.
आशीर्वाद
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment