🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २१७
प्रपंचाहून परमार्थ वेगळा वाटतो, हे खरे नाही. त्यात कृतीत फरक नाही. वृत्तीत फरक आहे.
प्रपंचातल्या गोष्टी न करणे, त्याहून काहीतरी वेगळे करणे हा परमार्थ नाही. सामान्य मनुष्य करतो त्याच गोष्टी साधू करतो.
ज्याचे महत्त्व जितके तितकेच त्याला द्यावे. प्रपंचाला फार महत्व दिले गेले. प्रपंचात पुरेसे वाटतच नाही.
"माझ्या मुळे प्रपंच चालतो" हे म्हणणे हा प्रपंच. "भगवंतामुळे होते" हे म्हणणे हा परमार्थ.
कर्तेपणा आपल्याकडे घेणे हा प्रपंच. तो भगवंताकडे देणे हा परमार्थ.
चांगली माणसे केलेले सांगत नाहीत. तीच खरी चांगली माणसे. पण त्याच्या पलीकडे नाम आहे. ते इतके चांगले आहे की ते केलेले कळत नाही.
आशीर्वाद
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment