19 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


  अमृतधारा - २१८


प्रत्येकाला काहीतरी गोष्टीची उणीव आहेच, त्यामुळे त्यास समाधान नाही हा अनुभव आहे.


मला काहीतरी पाहिजे. माझ्यातील असमाधानाचे मूळ त्यात आहे. माझे असमाधान आहेच. त्याचे फक्त कारण बदलते.  म्हणूनच ते कारण खरे नाही.


ते खरे कारण शोधले पाहिजे. त्यासाठी भगवंताने बुद्धी दिली आहे.


आम्हाला तात्पुरते समाधान पाहिजे. पण त्यातील घात (नुकसान) समजले तर तळमळ लागेल. भगवंताची नड लागली पाहिजे.


दृश्याची तळमळ असताना आम्ही त्यातच आयुष्य घालवतो. मग भगवंताची तळमळ लागल्यावर का होणार नाही? आम्हाला भगवंताची खरी तळमळ नाहीच. ती व्हावी (लागावी) असे त्याच्यापाशी मागावे.


आता समजून करायला लागले की समजते.


भगवंताची भूक लागायला नामस्मरण आवश्यक आहे.


  आशीर्वाद

 🌹🌹🌹

No comments: