🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २२१
भगवंताचे प्रेम लागले की सर्व उमजेल. ते प्रेम निर्माण व्हायला सर्व त्याग लागतो. तो आपल्या हातात नाही. आपल्या हातात एकच उपाय आहे. तो म्हणजे सहवास.
सहवासाचे प्रेम मोठे आहे. उद्धवाला सोडताना भगवंताच्या डोळ्यात पाणी आले.
सहवास कृती आहे. वृत्ती बनवायची आहे.
स्मरण कृती आहे. विस्मरण वृत्ती आहे.
सहवास कसा करावा? जोडणारी वस्तू दोन्ही ठिकाणी असावी. उदाहरणार्थ पतंगाची दोरी. भगवंताचे नाम तसे आहे.
भगवंताच्या लीला अगाध आहेत. त्यातील त्याच्या रुपाची कल्पना येणार नाही. निरनिराळ्या प्रसंगी त्याने निरनिराळी रुपे घेतली. न बदलणारे असे नामच आहे.
नाम तो सोडू शकत नाही, ते आपल्या जवळही आहेच. म्हणून आपण नामात रहायला शिकावे.
आशीर्वाद
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment