20 May 2025

                                         🌸 श्रीराम समर्थ 🌸

    अमृतधारा  २२२

 सहवासाने प्रेम येते. घराचे माणसांचे सहवासाने प्रेम येते. थोडे एकत्र राहून प्रेम येते. सहवास बळजबरीने करता येईल. संगतीने प्रेम आल्याशिवाय राहणार नाही.

 

आपल्याला आपलेपणाचे प्रेम नाही. बायकोत/नवर्यात आपलेपणा असतो तसा भगवंताबद्दल आपलेपणा नाही.

 

भगवंताच्या प्रेमाला जातीची, वयाची, परिस्थितीची अडचण नाही. आपण प्रेम वाढवीत नाही. अवडंबर वाढवतो. भगवंताच्या प्रेमाविना लिहिणारा, वाचणारा ऐकणारा फुकट आहे.

 

आपण भगवंताची पूजाअर्चा करतो पण तो माझा आहे असे वाटत नाही. भगवंतावर मुलाइतके आपले प्रेम नाही. मुलासारखा भगवंत वाटला पाहिजे.

 

भगवंताजवळ नेहमी राहणारे त्याच्याहून वेगळे राहणारे आमच्या हातात असणारे असे एक  नाम आहे. नामाने भगवंताचा सहवास होतो.

 

भगवंता करताच नाम घेतले तर त्याच्या सहवासाचे प्रेम येईल.

 

आशीर्वाद

🌷🌿🌷

श्रीराम समर्थ


No comments: