🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २०७
पैसा हे भाग्य नाही. वैभव नसले पण समाधान असले तर सर्व गोष्टी नसल्या तरी चालेल.
पैसा नसला तर अडचण नाही. असला तर चालते. पैशावाचून परमार्थ नाही हे म्हणणे खरे नाही.
कशीही अवस्था आली तरी त्यात सुखी नाही व दुःखीही नाही असे पाहिजे.
हल्ली पैसेवाला भाग्यवान म्हणतात. मग निती असो वा नसो.
जेथे भगवंत तो भाग्यवान.
संतांच्या जवळ पैसा नाही, जगाची विद्या नाही पण एक निस्वार्थी प्रेम व समाधान आहे. त्यामुळे ते स्मरले जातात.
मनुष्याला प्राण्यापेक्षा बुद्धीने जगात महत्त्व आहे. म्हणून बुद्धीवानाने समजून नाम घ्यावे.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment