🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २०८
भगवंतावाचून जो आनंद तो खरा नाही. म्हणून प्रपंचात सुखाकरता, आनंदाकरता भगवंतच पाहिजे.
माझ्या आनंदाच्या आड मीच येतो.
प्रत्येक गोष्टीचा गुणधर्म समजून उपयोग करणे हे बुद्धीचे काम आहे. चांगलेपणाचा जो गुणधर्म, तो समजला पाहिजे. जी वस्तू अशाश्वत आहे ती शाश्वत समजणे हा गुणधर्म समजला म्हणावा कसा ?
म्हणून प्रत्येक गोष्टीचा गुणधर्म ओळखून वागला तर दुःख नाही (मीठ साखर म्हणून खाल्ले आणि ते खारट लागले तर दुःख होणारच).
देह स्वाधीन नाही. मन स्वाधीन आहे. ते खंबीर ठेवावे. देहाप्रमाणे मनाला पण विश्रांती पाहिजे. ती नामस्मरणाने मिळते.
घेणारा "मी" ज्यावेळी देणारा होईल त्याच वेळेस स्वत:ला खरा आनंद होईल. जो नि:स्वार्थ बुद्धिने प्रेम करतो त्याला आनंद ख़ास मिळतो.
आशीर्वाद
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment