🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २०३
प्रपंच आडवळणाचा आहे. वारा येईल तशी पाठ द्यावी. त्याला तसे वळण द्यावे. प्रपंचात उंच-सखोलपणा आहे. कोणतीही परिस्थिती कायम रहात नाही.
माणसाने काढलेला रस्ता सुद्धा उंच-सखल असतो. मग प्रारब्धाचा रस्ता कसा साधा असेल?
प्रपंचात पैशा इतकीच धीराची गरज आहे. लोकांचा पैसा (लाॅटरी, लाच) त्याच्या वासनेसह येतो. तो अत्यंत हानीकारक असतो.
आपण प्रपंचाकरता नवस केला व देवाने दिला नाही तर देवाला देवपण नाही म्हणतो, म्हणजे थोडी तरी श्रद्धा जाते.
मिळाले नाही तर श्रद्धा कमी न व्हावी. भगवंताच्या इच्छेवर ठेवावे. परमार्थ सरळ आहे. तो सरळ करावा.
निस्वार्थपणाने प्रेम करणे म्हणजे परमार्थ.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment