🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २०२
आपण भगवंताजवळ मागत राहीलो व तो देत राहीला तरी मागणी राहीलच. मागणी पुरवणे व वासना नाहीशी करणे - यात दुसरी गोष्ट चांगली.
आपण सृष्टीक्रमाच्या म्हणजेच भगवंताच्या इच्छेविरुद्ध वागतो. "अमुकच दे" म्हणण्यात भगवंताच्या इच्छेविरुद्ध वागणे आहे.
कितीही मिळाले, कितीही वय झाले तरी वासना जात नाही. मला पाहिजे ते मिळून आजवर समाधान कुठे मिळाले? ते मिळाल्यावरही समाधान कधीच मिळणार नाही.
अशी कोणतीही वस्तू नाही की जी मिळाली असता समाधान होईल. मग ती मिळाली नाही तर दुःख कां व्हावे?
राजाचे वैभव मिळाले तरी समाधानाशिवाय ते फुकट (व्यर्थ) आहे.
"आणखी काही नको" हे पूर्णत्वापासून आले तरच समाधान आहे; कारण समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय!
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment