🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - २०१
प्रपंच हा प्रवासासारखा आहे. भगवंत नाही तर प्रपंच बुडालाच म्हटला पाहिजे.
प्रपंचातले सर्व भोगले पण समाधान नाही.
इतर सर्व गोष्टी होतील पण भगवंताचे ध्येय लक्षात ठेवून कराव्यात.
आपले ध्येय विसरून गेले तर प्रपंचाच्या धुंदीमुळे वासना वाढत जाते हे विसरता कामा नये.
मी कशाकरता आहे हे विसरल्यामुळे विषयातीलच काहीतरी पाहिजे असे वाटते. विषयातील खळगा इतका खोल आहे की तो कधीच भरत नाही. त्याने असमाधान होते व ते वाढतच जाते.
समाधान गाठले तर प्रपंचाचा भोग कमी झाला तरी चालेल.
वृत्ती आतून बदलली पाहिजे. समाधानी वृत्ती पाहिजे.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment