30 Apr 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २००


समाधान भगवंतानेच होईल. त्याच्या इच्छेने आले असे म्हणणे हाच उपाय आहे. ह्या वृत्तीला उपायकारक करणे हेच साधन व हाच परमार्थ आहे.


कर्तव्याने जे करता येईल त्यात समाधान राखणे हेच सहज जीवन होय.


जगात कर्तव्याने राहिले पाहिजे. भगवंतामुळे हे आहे. तो राहू देऊन जग गेले तर जाऊ दे अशी वृत्ती ठेऊन रहावे.


फळ देणारा भगवंत आहे, हे मनात ठेवून कर्तव्य करावे म्हणजे समाधान बिघडणार नाही. तरच बुद्धीचा उपयोग केल्यासारखे होईल. नाहीतर बुद्धी दिल्याचा भगवंताला पश्चात्ताप होईल.


समाधान हे सर्व वैभवाचा राजा आहे. ते कशात आहे हे सांगता येणार नाही. पण आपण भगवंताचे झालो म्हणजे समाधान मिळते.


भगवंताला फार आवड नाही. त्याला फक्त शुद्ध आचरण व स्मरण आवडते.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: