🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १९९
कोणत्याही कार्याचा चांगलेपणा हेतूवर असतो. कार्य बरेवाईट दिसेल पण हेतू चांगला तर ते चांगले असते. रावणाने मीपणाने तप केले म्हणून त्याचा नाश झाला.
हेतू माणसाच्या स्वाधीन आहे. विचाराने, विवेकाने पूर्व जन्मीची बुद्धी वळवली पाहिजे. नुसती विषयाची वृत्ती रावणासारखी आहे.
आपला हेतू भगवंताची प्राप्ती किंवा आनंदमय होणे हा आहे, नुसता पैसा मिळवणे नाही. माणूस पैशाने मोठा होत नाही. जगातले मोठेपण पैशावर वा परिस्थितीवर अवलंबून नाही, ते आपल्यावर आहे.
शेवट आपल्या स्वाधीन नाही. पण हेतू चांगला ठेवणे जरूरी आहे. भगवंताची प्राप्ती हा हेतू असेल तर इतर सर्व साधनं तदुपकारक पाहिजेत.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment