28 Apr 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - १९८


भगवंता, आता देशील त्यात मी राहीन पण तुझा वियोग नको. "तुझे स्मरण राहू दे" हेच शेवटी मागावे. हे मागितले तर भगवंताला आनंदच होईल. पण आपण तसेच मागितले पाहिजे.


उद्याचे आज कळत नाही. पण ते कळावेसे वाटते म्हणून दुःख होते. हे जीवनाचे रहस्य आहे.


मी कर्ता आहे या भावनेने काळजी लागते. बाप म्हणून जबाबदारी वाटते कारण मी कर्ता आहे असे वाटते.


आपण भगवंताचे होऊ या. हा अगदी सोपा मार्ग आहे.


राजाच्या पोटी जन्म घेतल्याने आपोआप साधते. तसे मनाने आपण भगवंताचे व्हावे. मग उपासनेची कटकट, त्रास राहणार नाही. पण ते, भगवंताचे अगदी मनाने झाले पाहिजे.


मोठ्या कष्टाने जे साधत नाही ते सहजपणे साधते. भगवंताचे होणे तसे आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव सतत ठेवावी.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: