25 Nov 2024

 ☘ श्रीराम समर्थ ☘


   अमृतधारा - ४३


भगवंताची निष्ठा उत्पन्न होणे हे महत्वाचे आहे. भगवंताच्या निष्ठेला पैका, विद्वत्ता नको. त्याला शुध्द आचरण, नीती व त्याचा सहवास पाहिजे. 


भगवंताची नड व भगवंताचा आपलेपणा आपल्याजवळ नाही.  त्याचा सहवास शक्य आहे व तो नामात आहे. 


भगवंताची भूक लागली की कसे वागावे ते आपोआप कळते. 


भगवंताने कृपा करावीशी वाटते, पण तळमळीशिवाय कृपेचा पाऊस पडत नाही व पडून उपयोगी नाही. 


आपल्याला तळमळ नाही म्हणून भगवंताची जरूर नाही. नड भासल्याशिवाय मोक्ष नाही. 


वैभव, शिखरावरील असो किंवा गटारातील असो, ज्याचे स्मरण टिकले, त्याला कृपा काय करते हे कळेल. 


नड संतांना लागली. आम्हाला नड उत्पन्न होण्याकरता (संतानी) कर्ममार्ग सांगितला. भगवंताची नड, तळमळ उत्पन्न झाली पाहिजे त्यासाठी "नाम" हे  एकच साधन आहे.


ज्याला भगवंताची तळमळ लागली, त्याला मार्गदर्शन होईलच, पण तळमळ नाही त्याला काय करावे? 


आशीर्वाद

☘🌷🌼

No comments: