प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज
७ मे
देहबुद्धीचा त्याग करावा.
मानाला कारण अभिमान होय. मी मोठा, असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला, गुरुआज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे, आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे, हे उपाय आहेत. पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरुआज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला. हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. खरे पाहता, अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय ? शक्ति, की पैसा, की किर्ती ? जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत. पण मौज अशी की, भिक्षा मागणार्यालासुद्धा मोठा अभिमान असतो. "मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट् म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी. " असे तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान, ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे ? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्दीला खत घालण्यासारखे आहे. चांगले-वाईट, मान-अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे, त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरीष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे. पण तो तितक्यापुरता, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान, जायला सद्गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी 'मी त्याचा अहे' असे म्हणावे. सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील.
परमार्थांत संतांचे ऐकण्याला महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये ? जर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तर्हा मोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे, म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा ! देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे; देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित् उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला, भगवंताच्या अनुसंधानासारखा कोणता उपाय असणार ?
१२८. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय.
प्रवचने - श्री ब्रह्मचैतन्य महाराज
देहबुद्धीचा त्याग करावा
Renounce the Ego of the Body
मानाला कारण अभिमान होय.
Ego arises because of pride.
मी मोठा, असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते.
When the mind thinks "I am great," it demands respect.
हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो.
This pride is what comes between God and us.
हा अभिमान घालवायला, गुरुआज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे, आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे, हे उपाय आहेत.
To remove this pride, one should live under the guru's command, surrender to them, and practice the disciplines they teach.
पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत.
But these practices must be done without any pride.
हा अभिमान फार सूक्ष्म असतो.
This pride is very subtle.
मी गुरुआज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला. हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय.
Saying "I follow the guru’s command and do the practices, so my pride is gone" is itself a statement of pride.
खरे पाहता, अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय? शक्ति, की पैसा, की किर्ती? जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत.
In truth, what do we really have to be proud of? Power, money, or fame? There are many greater people in the world.
पण मौज अशी की, भिक्षा मागणार्यालासुद्धा मोठा अभिमान असतो.
Yet, amusingly, even a beggar has great pride.
"मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट् म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी." असे तो म्हणतो.
He says, "I went begging at Amka’s place, and since he told me to get lost, I haven’t gone there again."
तेव्हा हा अभिमान आणि अपमान, ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे.
Thus, we must investigate what this pride and insult really are.
याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे.
The root cause is the ego of the body. This ego must be destroyed.
एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे?
If you apply fertilizer to a tree, how can it die?
मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्दीला खत घालण्यासारखे आहे.
Wanting people to praise you or feeling bad about insults is like fertilizing the body-ego.
चांगले-वाईट, मान-अपमान सर्व देवाला अर्पण करावे.
Offer all praise, insult, good and bad to God.
वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे, त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत.
In reality, surrender the responsibility to Him, so the results of actions do not affect your mind.
व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा.
Some pride in dealings is necessary, but only as needed by the situation.
वरीष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे. पण तो तितक्यापुरता, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये.
A superior needs pride when dealing with servants, but it should not affect his mind.
ही देहबुद्धी, हा अभिमान, जायला सद्गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी 'मी त्याचा अहे' असे म्हणावे.
This body-ego and pride must go by becoming the guru’s. At least forcibly say, "I am His."
सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील.
The guru will unknowingly remove your pride.
परमार्थांत संतांचे ऐकण्याला महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये?
In spirituality, listening to saints is important. Why not listen to one’s own parents there?
जर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे.
Special importance is given to listening to those whose minds are in control, steady, or always with God.
आपल्या देहबुद्धीची तर्हा मोठी विलक्षण असते.
The body-ego is very strange and subtle.
सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही;
People avoid devotional practice because it disrupts their habits;
फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही;
Because it is very simple, they do not take God’s name;
आणि फुकट काय जेवायला घालायचे, म्हणून तो अन्नदान करीत नाही.
And since food is free, they do not donate food.
असा मनुष्य फुकटच जायचा!
Such a person goes to waste!
देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे.
To control the body-ego, reading saints’ scriptures is necessary.
पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे;
At dawn there is some light and some darkness; similarly, this is our current state;
देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित् उजेड आहे.
In the darkness of body-ego, there is a little light of remembering God.
हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला, भगवंताच्या अनुसंधानासारखा कोणता उपाय असणार?
What method is there like constant remembrance of God to remove this darkness of body-ego and see full light?
मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय.
Complete sacrifice of ego and pride is the true sacrifice.
Summary in Marathi:
देहबुद्धी म्हणजे आपल्या शरीराशी संबंधित अभिमान आणि अहंकार होय, जे भगवंत आणि आपल्या मध्ये अडथळा आणते. हा अभिमान फार सूक्ष्म असतो आणि तो कमी करण्यासाठी गुरूची आज्ञा पाळणे, त्यांना शरण जाणे, आणि निरभिमानाने साधना करणे आवश्यक आहे. आपल्या कृत्यांचे परिणाम देवाला अर्पण करणे, आणि मनावर त्यांचा परिणाम होऊ न देणे हे देखील महत्त्वाचे आहे. संतांचे वाचन आणि त्यांचे शब्द ऐकणे देहबुद्धी कमी करण्यास मदत करतात. शरीराचा अहंकार नष्ट करून भगवंताच्या नामस्मरणाचा प्रकाश मनात वाढवणे आवश्यक आहे.
Summary in English:
Body-ego refers to the pride and ego related to our physical body, which creates a barrier between God and ourselves. This pride is very subtle and to reduce it, one must obey the guru’s commands, surrender to them, and practice disciplines without pride. Surrendering the results of our actions to God and not letting them affect the mind is important. Reading and listening to saints helps diminish body-ego. One must destroy the ego of the body and increase the light of God’s remembrance in the mind. Complete sacrifice of ego and pride is the true spiritual offering.
No comments:
Post a Comment