4 Jun 2025

 

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

६ मे

स्वार्थ आवरल्याने परस्परप्रेम वाढते.


  

परस्परांत प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. एक, बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी; म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरी, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली, तर त्या व्यक्तीविषयक न बोलता, नम्रतेने आणि गोड शब्दांत सांगावी. चौथी, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जीमध्ये या सर्वांचा बर्‍याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब, म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते, त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसर्‍याकरिता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे.

आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की, मी कुठे स्वार्थी आहे ? मी कुठे कुणाजवळ काय मागतो ? पण एवढ्याने 'स्वार्थदृष्टी नाही' असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो; कायिक वाचिक व मानसिक. देहाला दुसर्‍यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे, हा कायिक स्वार्थ म्हणतात. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी काही कोणाला कमीजास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा तर्‍हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तर्‍हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता, मी माझ्याकरिता जितका असेन त्याहून जास्त मी दुसर्‍याकरिता आहे, असा विचार केला तर असे दिसून येईल की, मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो, तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसर्‍याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच, जे दुसर्‍याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही, ते आपण दुसर्‍याच्या बाबतीत न करणे; आणि त्याच्याच उलट, जे दुसर्‍याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसर्‍याच्या बाबतीत करावे. हेच सर्वाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे.


१२७. जो निःस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो.



स्वार्थ आवरल्याने परस्परप्रेम वाढते
Selflessness Increases Mutual Love

परस्परांत प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत.
Some things are necessary to increase love between each other.

एक, बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी; म्हणजे द्वेष वाटणार नाही.
First, overlook small faults and give some tolerance to everyone’s nature; this prevents resentment.

दुसरी, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी.
Second, keep your focus on that place in everyone’s heart where love exists.

तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली, तर त्या व्यक्तीविषयक न बोलता, नम्रतेने आणि गोड शब्दांत सांगावी.
Third, if you need to give any advice, say it gently and kindly without criticizing the person.

चौथी, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जीमध्ये या सर्वांचा बर्‍याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब, म्हणजे स्वार्थाला आळा घालणे.
Fourth, a very important thing that includes all these is restraining selfishness.

म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते, त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसर्‍याकरिता आहे असे वाटणे हे होय.
It means thinking that I care for others even more than I care for myself.

आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते.
And behaving with this awareness helps increase love.

ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही.
A person who does not seek selfish gains will never lack anything.

जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे.
Where there is selflessness, God surely provides.

आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की, मी कुठे स्वार्थी आहे ? मी कुठे कुणाजवळ काय मागतो ?
When thinking of selfishness, it may feel, "Where am I selfish? Where do I ask anything from others?"

पण एवढ्याने 'स्वार्थदृष्टी नाही' असे म्हणता येणार नाही.
But with just that, one cannot say, "I am not selfish."

अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे.
Ego is a powerful form of selfishness.

त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही.
Its roots are so deep and subtle that we don’t even realize it.

स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो; कायिक वाचिक व मानसिक.
Selfishness can be of three types: physical, verbal, and mental.

देहाला दुसर्‍यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे, हा कायिक स्वार्थ म्हणतात.
Physical selfishness means caring so much for the body that you avoid any hardship for others.

माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी काही कोणाला कमीजास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा तर्‍हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात.
Verbal selfishness is wanting everyone to agree with you and silently tolerate your harsh words.

आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तर्‍हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल.
Mental selfishness is wanting everyone to act according to your opinion and believe your thoughts are always right.

आता, मी माझ्याकरिता जितका असेन त्याहून जास्त मी दुसर्‍याकरिता आहे, असा विचार केला तर असे दिसून येईल की,
Now, if I think that I am for others more than I am for myself, it will become clear that

मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो, तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसर्‍याला ठेवणे जरूर आहे.
I should give others at least as much care as I give myself, or even more.

म्हणजेच, जे दुसर्‍याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही, ते आपण दुसर्‍याच्या बाबतीत न करणे;
That is, not doing to others what we wouldn’t like done to us;

आणि त्याच्याच उलट, जे दुसर्‍याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसर्‍याच्या बाबतीत करावे.
And doing to others what we would appreciate if done to us.

हेच सर्वाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे.
This is the essence of everything and the true religion.

आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही.
We will not receive love unless we love the world.

आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात.
If we love many, we benefit them individually, but in return, they all help us.

जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे.
One who loves many is considered to have attained God.

१२७. जो निःस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो.
127. One who loves with selfless wisdom receives special joy.

Summary in Marathi:
स्वार्थ कमी केल्याने परस्पर प्रेम वाढते. छोट्या छोट्या त्रुटींना दुर्लक्ष करून एकमेकांना थोडी सहनशक्ती द्यावी. प्रेम करताना नम्र आणि गोड बोलणे आवश्यक आहे. खरे प्रेम म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्याचा अधिक विचार करणे. अहंकार आणि स्वार्थ हे प्रेमाचे मोठे अडथळे आहेत. आपल्याला जे आवडते ते दुसऱ्याला देखील द्यावे, आणि जे आपल्याला त्रासदायक वाटते ते दुसऱ्याला करू नये. निःस्वार्थ प्रेम करणाऱ्याला खरी आनंदी भावना प्राप्त होते.


Summary in English:
Reducing selfishness increases mutual love. One should overlook small faults and be tolerant of others. Loving with humility and kindness is essential. True love means thinking more for others than oneself. Ego and selfishness are major obstacles to love. Treat others as you wish to be treated—give others what you like and avoid causing them harm. Those who love selflessly experience true joy.

No comments: