प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज
अभिमान न धरता कर्तव्यकर्म करावे.
मला कळत नाही' असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने, 'मला सर्व समजते' असे मानून जगात वावरत असतो. खरोखर, अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणेसुद्धा थोडे अपुरेच पडेल; कारण हरळी वाढली तर ती दिसते, आणि म्हणून ती उपटून तरी टाकता ह्येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही, आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गांत मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे; आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्यभावाने शरण जाऊन, अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय.
चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न, बी उत्तम असणे जरूर आहे. उत्तम बी कोणते हे कदाचित् आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते. आता असे समजा, जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली. तरीपण पुढे असे अनुभवाला येते की, काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात् फळे मिळायची बंद होतात, आणि त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे दिसते की, आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की, ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ करून देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल ? 'कोणतीही नाही' असेच उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही, असे म्हणावे लागते. याकरिताच, भगवंताशिवाय दुसर्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्यकर्म करीत राहणे, हाच सुखाचा मार्ग आहे, आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की, 'हे देवा, तुझी भक्ति तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर.' त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणे जरूर आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो, आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ति करता करता, भगवत्प्राप्तीशिवाय इतर होणार्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत्प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल.
१२६ खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे.
अभिमान न धरता कर्तव्यकर्म करावे
Perform Duties Without Pride
'मला कळत नाही' असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे.
Feeling "I do not understand" is the first step in spiritual progress.
आपण अभिमानाने, 'मला सर्व समजते' असे मानून जगात वावरत असतो.
We often live in the world arrogantly thinking, "I understand everything."
खरोखर, अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही.
Truly, there is no greater enemy to spirituality than pride.
अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणेसुद्धा थोडे अपुरेच पडेल;
Saying pride destroys like a weed is still an understatement;
कारण हरळी वाढली तर ती दिसते, आणि म्हणून ती उपटून तरी टाकता ह्येते.
Because when weeds grow, they are visible and can be pulled out.
तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही, आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच लागणार नाही.
Pride is not like that; it is invisible and you cannot know when or how it will rise.
चित्तशुद्धीच्या मार्गांत मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे;
If there is any big obstacle on the path of mind purification, it is pride.
आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल.
Thinking you can escape its grasp by your own efforts is foolish.
त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्यभावाने शरण जाऊन,
The way to escape its grip is by surrendering wholeheartedly to the Sadguru,
अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय.
and constantly praying for liberation from pride.
चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही.
When the mind is purified, it can be said that the field is fully cultivated.
पुढे प्रश्न, बी उत्तम असणे जरूर आहे.
Next question is that the seed must be good.
उत्तम बी कोणते हे कदाचित् आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते.
We may not know which seed is best, but it is easy to recognize good fruit.
आता असे समजा, जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली.
Suppose we cultivate only the fruits that taste sweet.
तरीपण पुढे असे अनुभवाला येते की, काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात् फळे मिळायची बंद होतात,
Still, after some time, the tree dies as per its lifespan and stops bearing fruit,
आणि त्यामुळे मन कष्टी होते.
which causes sorrow in the mind.
यावरून असे दिसते की, आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात.
This shows that even the sweet fruits eventually cause sorrow.
तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की, ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ करून देणारी आहेत.
Therefore, when selecting seeds, we must choose those whose trees endure and yield eternal happiness.
जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल ?
Is there anything in this world that is eternal?
'कोणतीही नाही' असेच उत्तर येईल.
The answer is "nothing."
म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही, असे म्हणावे लागते.
Hence, any work done with hope for perishable fruits does not lead to lasting happiness.
याकरिताच, भगवंताशिवाय दुसर्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्यकर्म करीत राहणे, हाच सुखाचा मार्ग आहे,
Therefore, performing duties without hoping for any fruit except God’s grace is the path to happiness,
आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे.
and this is the sowing of the best seed.
भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की,
We should sincerely pray to God,
'हे देवा, तुझी भक्ति तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर.'
"O God, grant that my devotion is not with the hope of any fruit other than You."
त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणे जरूर आहे.
From this perspective, we must also make an effort.
ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो,
Just as when we thresh grain mixed with chaff to separate them,
आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो,
and blow away the chaff, leaving behind good grain,
त्याप्रमाणे भगवंताची भक्ति करता करता, भगवत्प्राप्तीशिवाय इतर होणार्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा,
similarly, while doing devotion to God, we must gradually remove desires other than God-realization,
म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत्प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल.
so that over time, the feeling of attaining God alone will become firm.
१२६ खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे.
True happiness must be lasting.
Summary (Marathi):
परमार्थाच्या प्रवासात ‘मला कळत नाही’ अशी ओळख महत्वाची आहे कारण अभिमान हा सर्वांत मोठा अडथळा आहे. अभिमान दिसत नाही, त्यामुळे त्यावर सतत सद्गुरूची प्रार्थना करावी लागते. चित्तशुद्धी झाल्यानंतर योग्य बीज म्हणजे अक्षय सुख देणारे बीज निवडणे गरजेचे आहे. जगात काहीही कायमस्वरूपी टिकत नाही; त्यामुळे भगवंताशिवाय इतर कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्यकर्म करणे हे खरे सुख आहे. भगवंताची भक्ती करताना, इतर सर्व इच्छा दूर करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे भगवंतप्राप्तीची भावना दृढ होते आणि खरी आनंदाची प्राप्ती होते.
Summary (English):
In the spiritual journey, acknowledging "I do not understand" is crucial because pride is the greatest obstacle. Pride is invisible, so one must constantly pray to the Sadguru for liberation from it. After purifying the mind, it is important to choose the right seed — one that yields eternal happiness. Nothing in this world is permanent; therefore, performing duties without expecting any fruit except God's grace is true happiness. While practicing devotion to God, one should strive to remove all other desires, strengthening the feeling of attaining God alone, which leads to true and lasting joy.
No comments:
Post a Comment