4 Jun 2025

 

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

      

८ मे

भगवंताचे अनुसंधान राखावे.


    

फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुनः पुनः फाटतोच. तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे, आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरण बाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असलो की प्रपंचात मजा आहे; अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणार्‍या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडातिकडा पोहेल, तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची भिती वाटत नाही. विषय जोवर ओळखले जात नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरिता, ज्या ज्या गोष्टी होत असतात, त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत, ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्‍न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. त्याच्या पायावर मस्तक ठेवावे, आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की, "हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले, तरी वृत्ती आड आल्याशिवाय रहात नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे. तरी तुझी, म्हणजे पर्यायाने माझीच, ओळख पटावी, आणि त्यात मी तुला पाहावे, हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. तरी, हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन. तू मला आपला म्हण. "


१२९. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच.

प्रवचने - श्रीब्रह्मचैतन्य महाराज

८ मे
भगवंताचे अनुसंधान राखावे

Marathi - English line by line translation

फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुनः पुनः फाटतोच.
If a joint is used for many days and breaks, no matter how much it is repaired, it breaks again and again.

तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते.
Similarly, the body is like that. Once the body ages, something or the other always happens to it.

दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते.
If a nail in a repaired joint pricks the foot, then it needs to be taken care of.

तसे, आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये.
Similarly, if the mind is pricked by illness, it should be guarded, and its effect should not be allowed to trouble the mind.

आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा.
We should take advantage of our illness and old age.

एखादी शहाणी सुगरण बाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे.
Just as a wise washerwoman makes a bundle of clothes, similarly, we should learn to keep the remembrance of God alive through our sufferings.

अनुसंधानात असलो की प्रपंचात मजा आहे; अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल.
If we are in remembrance, then life’s play is enjoyable; even difficulties and troubles will seem enjoyable.

पोहायला येणार्‍या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही.
If you just tell a learner swimmer to swim straight, he will not like it.

तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडातिकडा पोहेल, तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल.
He will jump, dive, swim crookedly; similarly, if one stays in God’s remembrance, life’s play will be enjoyable.

कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची भिती वाटत नाही.
Once something is understood, then we no longer fear it.

विषय जोवर ओळखले जात नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात.
Subjects trouble us only till they are not understood.

याकरिता, ज्या ज्या गोष्टी होत असतात, त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत, ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्‍न करावा.
Therefore, we should try to control our attitude by keeping the awareness that whatever happens, happens by God’s will.

परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो.
Behind spirituality, we ourselves come in the way.

आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे भगवंताची वस्ती असते.
Wherever our attitude goes, God resides there.

म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते.
So, even if any thought arises, remembering God there quickly dissolves it.

आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे.
We should always remember our worshipped deity.

त्याच्या पायावर मस्तक ठेवावे, आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की,
We should bow our head at His feet and pray with exclusive devotion,

"हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार.
"O God, these troubles coming in my way will not go away without Your grace.

आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला.
Till now, I have experienced the world.

तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले, तरी वृत्ती आड आल्याशिवाय रहात नाही.
I have started feeling that without attaining You, there is no happiness, yet my mind does not stop wandering.

माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे.
Due to my ignorance, I am obstructing myself today.

तरी तुझी, म्हणजे पर्यायाने माझीच, ओळख पटावी, आणि त्यात मी तुला पाहावे, हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे.
Still, I want to recognize You, who is essentially mine, and see You in that; this is the last wish of my life.

ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही.
This wish cannot be fulfilled without Your grace.

तरी, हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर.
So, O God, make my mind stay at Your feet.

यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको.
I want nothing else in the world.

आता मी तुझा झालो.
Now I am Yours.

यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन.
From now on, whatever happens, I will consider it Your will and will make relentless efforts to chant Your name.

तू मला आपला म्हण."
Call me Your own."

१२९. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच.
When the attitude becomes steady, contentment naturally follows.


Summary

Marathi:
भगवंताचे अनुसंधान म्हणजे सतत भगवंताची आठवण ठेवणे आणि जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत त्याच्या इच्छेची जाणीव ठेवणे. आजारपण, वय, दुःख असे काहीही असले तरी त्यातून भगवंताचे स्मरण ठेवले पाहिजे. असं केल्याने जगण्याचा अनुभव सुखद होतो, भीती नष्ट होते आणि मन स्थिर होते. आपल्या वृत्तीवर नियंत्रण ठेवून भगवंताला अर्पण करणे हेच खरी साधना आहे.

English:
The remembrance of God means constantly remembering God and being aware of His will in every circumstance of life. Despite illness, old age, or suffering, one should keep remembering God. This makes the experience of life joyful, fear disappears, and the mind becomes steady. Controlling one’s attitude and surrendering to God is the true spiritual practice.


No comments: