प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज
९ मे
शुद्ध वातावरण व पवित्र आचरण.
आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणार्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्य प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादि सर्व काही यश संपादन करा; अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐष आरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा; पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील, पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरांतही गुंतू नका; दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला, आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला; दोघेही मेल्याचे सुतक सारखेच ! त्याचप्रमाणे, मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. ढोंग, बुवाबाजी, इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगतो, की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून, त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरूरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी ? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.
श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठविले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे; ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, "देवा, तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे." खरोखर, त्या नामाचे माहात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात; इथून रामाजवळून काही मागून न्यायचे असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील, हा भरवसा बाळगा.
१३० आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे.
प्रवचने - श्रीब्रह्मचैतन्य महाराज
🌸 ९ मे 🌸
शुद्ध वातावरण व पवित्र आचरण
आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे.
The atmosphere in your home should be pure, peaceful, and sacred.
आपल्याकडे येणार्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे.
Anyone who comes to your home should feel reluctant to leave.
अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्य प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादि सर्व काही यश संपादन करा;
Understanding that the world is governed by God’s will, attain knowledge, prosperity, and family success in this world.
अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐष आरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा;
Live comfortably in this world as if you are a king reclining on cushions.
पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या.
But while doing this, let your heart remain drenched in God’s love.
कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे.
Do not quarrel with anyone. Worldly respect is very harmful.
त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो.
Once caught by it, a person chases after respect, but later the efforts to gain respect stop, and respect disappears too.
जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो.
Even the invincible men of the world get caught in some matter, which becomes their downfall.
जगाला ते भारी असतील, पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही.
They may be powerful in the world, but before that issue, they are helpless.
प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरांतही गुंतू नका; दोन्ही सारखेच घातक आहेत.
Do not get entangled in love or hatred and jealousy; both are equally harmful.
आपला प्रिय नातेवाईक मेला, आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला; दोघेही मेल्याचे सुतक सारखेच !
Your beloved relative died, and the one you claimed as your brother also died; both are like death rituals (periods of impurity).
त्याचप्रमाणे, मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते.
Similarly, whether a person is caught in love or hatred, the damage is the same.
भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो.
Forgetting God is never good for any reason, whether due to worldly comforts or worldly suffering.
ढोंग, बुवाबाजी, इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका.
Do not get involved in hypocrisy, pretentiousness, or deceit.
अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका.
It’s okay even if you do nothing, but never do hypocrisy.
आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगतो, की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका.
Everyone, please bless me; from experience, I say do not fall into the trap of becoming a 'baba' (false saint).
आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून, त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या.
Fulfill your duty by remembering God and keep your remembrance continuous.
आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरूरी आहे.
To develop such an attitude, we need the company of saints.
आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी ?
We all say we are in satsang (holy company), then why should our attitude not improve?
तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.
Because we have not adopted what the saints like, our attitude does not improve.
श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठविले.
Lord Krishna gave Uddhava knowledge and sent him to the Gopis.
भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले.
They were immersed in God’s name. Seeing the Gopis' love for the name, Uddhava was amazed.
नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे; ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, "देवा, तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे."
They saw God in the name; seeing this, Uddhava told God, "God, You have given me knowledge, but Your devotees’ love is superior; please give me that."
खरोखर, त्या नामाचे माहात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे.
Truly, the glory of that name is even harder to describe than God Himself.
तुम्ही सर्वजण इथे आला आहात; इथून रामाजवळून काही मागून न्यायचे असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा.
You all have come here; if you want to ask anything from Rama, ask for love of His name.
सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील, हा भरवसा बाळगा.
Everyone chant the name and stay happy. Keep the faith that Rama will bless you.
संक्षिप्त सारांश / Summary:
शुद्ध आणि पवित्र वातावरण घरात राहिले पाहिजे. जगाच्या मानाच्या मोहात न पडता अंतःकरण भगवंताच्या प्रेमाने भरलेले ठेवावे. प्रेम, द्वेष, मत्सर यांपासून दूर राहावे कारण ते नुकसानकारक आहेत. सतत भगवंताचे स्मरण करत राहणे आणि संतांच्या संगतीत राहणे आवश्यक आहे. भगवंताच्या नामामध्ये प्रामाणिक प्रेम हे सर्वांत मोठे आहे.
A pure and sacred atmosphere should prevail in the home. Avoid worldly pride and fill your heart with God’s love. Stay away from love, hatred, and jealousy as they are harmful. Constant remembrance of God and keeping the company of saints is essential. True love for God’s name is supreme.
१३०. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे.
130. Life should be simple. In simplicity lies contentment.
No comments:
Post a Comment