31 Mar 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


   अमृतधारा - १७०


प्रत्येकाला आनंदी व्हावेसे वाटते. त्यास आनंद मिळण्यासारखी वस्तू पाहिजे.


दृश्य वस्तू नेहमी टिकणारी नाही. जी चिरकाल टिकणारी वस्तू आहे, तीच आनंदाची असते. ती वस्तू म्हणजेच भगवंत.


ज्याला आनंद पाहिजे,   त्याला भगवंत पाहिजे. भगवंत दिसायला श्रद्धेचे डोळे उघडावे. ते उघडायला नाम घ्यावे.


प्रत्येकाने आपल्या ठिकाणी भगवंत आहे हे समजावे. हा परमार्थ.


सर्वत्र पसरलेला भगवंत कोणालाच दिसत नाही. याचे कारण काय? अडचण काय?


अडचण सर्वांनाच असली पाहिजे. डोळे मिटले तर जग नाहीसे होते. तसे परमात्मा नाहीसा व्हायला लहानसा दुर्गुण पुरतो. तो म्हणजे "अभिमान".


उपाधीरहित राहणे म्हणजे "मी नाही तो आहे" ही भावना. आणि सर्व त्याच्या इच्छेने होते हे अभिमानरहित वागणे होय.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: