31 Mar 2025

 🌸  श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - १६९


पुष्कळांच्या हृदयात राम प्रगट व्हावा म्हणून त्याची देवळात स्थापना करतात.


पण नुसती देवळात स्थापना होऊन उपयोग नाही. सर्वांनी नाम घ्यावे. नामाला सोडून रामाला राहता येणार नाही.


जेथे नाम तेथे राम राहील.


रामाला कोंडायला हृदयात ठेवावा व नाम घ्यावे. राम हृदयात आला तर त्याचा उपयोग.


ज्याला राम आपल्या बरोबर यावा असे वाटते त्याने सतत नाम घ्यावे. 


राम आत दिसला पाहिजे. एकदा पाहिला तो आत स्थिर  राहिला पाहिजे. त्यासाठी नामस्मरण पाहिजे.


प्रत्येकाला कशाची तरी आवड असते तेथे तो गुंततो. तसा भगवंत नामात आहे.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: