31 Mar 2025

 🌸 श्रीराम समर्थ🌸


   अमृतधारा - १६८


योग कोणत्याही मार्गाने साधुया. शेवटी भगवंताचा योग येणे महत्त्वाचे आहे आणि भक्तीशिवाय तो योग येणे नाही.


नामाचे प्रेम येणे महत्त्वाचे आहे. ते ज्याने साधेल त्याने ते करावे.


एक प्रेम साधले की सर्व येते. नामाचे प्रेम आले म्हणजे इतर काही जरूर नाही. 


कुळधर्म, यात्रा सर्व नामात येतात. नामात रहावे. भगवंताचे स्मरण राखणे महत्वाचे. त्याकरिता नाम घ्यावे.


उद्योगधंदा /व्यवसायातील माणसांना  जपसंख्या (पूर्णच) होईल असे सांगता येणार नाही. पण आवड असणे जरूर आहे.


सकाळी उठताना व रात्री झोपताना एकेक माळ करावी (नेहमीचा जप सोडून). मग रात्री झोपताना एकाद वेळ राहिली व झोप लागली तर जप करीतच जाग येते.


नाना तर्‍हेचे लोक भेटतील. त्यात कर्तव्य सांभाळणे कठीण. पण कर्तव्यात स्मरण ठेवले तर ते भगवंतापर्यंत जाईल.


आशीर्वाद .

🌹🌹🌹

No comments: