31 Mar 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


   अमृतधारा - १७१


अभिमान म्हणजे आरशावरची धूळ आहे. अभिमानाने सर्व केलेले फुकट जाते. अभिमान नाहीसा करणारे कर्म करावे.


अभिमान जन्माबरोबर येतो आणि मरेपर्यंत राहतो. 


अभिमान जाण्याकरता सर्व नियम आहेत. सर्व बाजूंनी घेरून तो नष्ट केला पाहिजे. जन्मजात दुःखे मेल्याशिवाय जात नाहीत. 


मीपणाने मरणे हे आपले मरण आहे. ते देहबुद्धीने मरणे, त्याकरता भगवंताचे स्मरण हवे. 


रामाचा शत्रू रावण. तसा भगवंताच्या आड अभिमान येतो. लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत अभिमान काही सोडत नाही.


अभिमानाच्या निरसनार्थ साधन (नामस्मरण) करावे लागते.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: