🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १७२
हवेनकोपण हे दुःखाचे मूळ आहे. तीच वासना होय. तीच तापदायक आहे. लुडबुडणारी वासना आपण ठेवावीच का?
वासना टाकणे कठीण आहे. पण ती सुख देत नाही असे तरी आपण का म्हणत नाही? ती टाकण्याचा उपाय करावा.
वासनेचे मूळ कर्तेपणात आहे. कर्तेपणाने करणे हे कष्टाचे आहे. सुखी होण्यापेक्षा दुःखी होणे अधिक कष्टाचे आहे.
दुःखाला कारण लागते, सुखाला नाही म्हणून ते सोपे.
परमार्थ इतका का सोपा आहे? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का? आणि चांगल्या वासना सुद्धा नीती आणि धर्माला धरुन असतील तेवढ्याच भोगाव्या.
वासना नष्ट झाल्यावरच बुद्धी भगवत्स्वरूप होईल.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment