🌸❗श्रीराम समर्थ❗🌸
अमृतधारा - १४९
श्री महाराजांना विचारलेले प्रश्न व त्यांनी दिलेली उत्तरे.
१) सर्व भगवंत करतो याचा अप्रत्यक्षपणे अनुभव, दाखला येतो. काहीतरी प्रत्यक्ष पुरावा कसा मिळेल?
जोवर देहबुद्धी आहे तोवर प्रत्यक्ष अनुभव आला तरीसुद्धा भ्रम होईलच. त्याला आतून वृत्ती तयार व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष भगवंताने स्वतः येऊन सांगितले तरी भ्रम झाल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी प्रकारचा भ्रम होईलच. आतून वृत्ती तयार झाली तर अगदी सामान्य गोष्टीतही भगवंत दिसेल. प्रत्येक गोष्टीत चमत्कार दिसेल.
२) चमत्काराचा अनुभव येत नाही असे कसे होईल?
आपण जिवंत राहतो हा चमत्कारच आहे. आपण मरत नाही म्हणून जिवंत राहतो. जन्म व मरण याकरिता आपण काय केले आहे? तो एक चमत्कारच आहे. असे अनेक चमत्कार आहेत. हा अनुभव आहे तरी भ्रम आहेच.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment