11 Mar 2025

 🌸❗श्रीराम समर्थ❗🌸


   अमृतधारा - १४८


खरे म्हणजे आपण काही करत नाहीच हा ही अनुभव आहेच. आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही तोवर कर्ता कोणीतरी आहेच. हा अनुभव आहे.


पण मनासारखे झाले म्हणजे साहजिकच आपण त्यात  "मी" घालतो.


यात अनुभवाचे काय झाले? याचा अर्थच असा की माणूस अनुभवाने शहाणा होत नाही.


ते फार थोड्यांचे बाबतीत होते. आपल्या बाबतीत होत नाही. 


अनुभव आला तरी देहबुद्धी आड येते. म्हणून आत बदल झाला पाहिजे.


वृत्ती बदलली पाहिजे. वृत्तितून कृती होते. कृतीवर वृत्ती अवलंबून नाही.


वृत्ती तयार झाली तर त्यात कृती नसेलही. पण कृती झाली व वृत्ती नसेल तर परिणाम होणार नाही.


म्हणून वृत्ती बदलणे अवश्य आहे (हे नामाने साध्य होते).


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: