🌸❗श्रीराम समर्थ❗🌸
अमृतधारा - १४७
आपण देव मानतो कारण तो ज्ञानी आहे म्हणून.
त्याला आपले कल्याण समजते तरीही आपण त्याच्याजवळ मागतोच.
मागू नये असे नाही. पण कल्याणाचे असेल तर दे म्हणावे.
देव आईसारखा आहे. व्यवहारातही आईला आपले मूल दुःखी व्हावे असे वाटत नाही. मग भगवंताला ते कसे वाटेल?
आपल्या कल्याणाचे असेल तर भगवंत करतो.
आपण मागितलेले मिळाले नाही तर निष्ठा कमी होते. निष्ठा कमी होऊ देता उपयोगी नाही.
देवावर निष्ठा व नीतीचे आचरण या दोन गोष्टी कराव्या व नामात राहावे.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment