7 Mar 2025

 🌸❗श्रीराम समर्थ❗🌸


    अमृतधारा - १४६


आज आपल्याला खरे सुख नाही. दुःखाची जाणीव कमी आहे इतकेच. ते खरे सुख नाही.


दुःख आहे म्हणजे भगवंताचे अस्तित्व नाही. हा अनुभव आहे. आपले कर्तृत्व खरे नाही.भय वाटते म्हणजे खात्री नाही हा अनुभव आहे.


भगवंत आहे हा अनुभव नसेल पण भगवंत नाही हा अनुभव आहे.


आपण चोवीस तास भगवंताचे आहोत हे स्मरून वागणे म्हणजे परमार्थ.


आपले कर्तृत्व नाहीं हा अनुभव आहेच. ते समजून भगवंताच्या स्मरणात राहणे हा परमार्थ.


घरात देवघर आहे म्हणणे हा प्रपंच व देवघरात आम्ही राहतो म्हणणे हा परमार्थ.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: