🌸❗श्रीराम समर्थ❗🌸
अमृतधारा - १४५
प्रपंच मालकीने करावा. आपण दास्यत्वाने राहतो. विकारांचा दास होणे हा प्रपंच. त्याचा मालक होणे परमार्थ.
सर्व माझ्याकरिता नाही ही परमार्थाची शिकवण.
आपण बुवा (साधू) ची कल्पना विचित्र केली आहे. विपरीत कृति, वेष वगैरे आपण पाहतो.
बुवाला राहणे खाणे वगैरे असतेच मग फरक कोणता तर वृत्तीचा.
बुवा (साधू) हुशार पाहिजे. (आपल्याला) प्रपंचाचे पाहिजे आहे. पण तो खुशीने देत नाही. परमार्थाची वृत्ती निर्माण करील तो खरा बुवा.
वृत्ती बनवणे म्हणजे परमार्थ बाकी गोष्टी प्रारब्धाने येतील.
नामाचा संबंध वृत्तिपर्यंत गेला की अनुसन्धान टिकले. नाम हे अत्यंत सुक्ष्म आहे व वृत्तिसुद्धा सुक्ष्म आहे. दुसऱ्या कशासाठी नाम न घेता ते वृत्ति सुधारण्यासाठी घ्यावे.
वृत्ति सुधारली की चित्त शांत होईल. चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ एक आहे.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment