11 Mar 2025

 🌸❗श्रीराम समर्थ❗🌸


  अमृतधारा - १५०


जगातील कर्तेपण पाहून माझे कर्तेपणा कमी करण्याचा व भगवंताचे कर्तृत्व पाहण्याचा अभ्यास माणसाने केला पाहिजे.


परंतु शेवटी वृत्ती बदलणेच जरूर आहे. वृत्ती इतकी खोल गेलेली आहे की ती सहसा बदलणे कठीण जाते.


मोठे झाड तोडायचे असेल तर अगोदर फांद्या तोडून मग बुंधा तोडावा लागतो. तो तोडणे कठीण असते. कारण मुळ्या फार खोल गेलेल्या असतात, व फार लांब पसरलेल्या असतात.


त्या सर्व तोडून खणून काढल्या पाहिजे. त्यावर डांबर टाकून पुन्हा अंकूर फुटणे बंद करावे लागते.


दृश्य झाडाचे जर इतके कठीण तर मग आपले सूक्ष्म (वृत्ती बदलणे) किती कठीण असेल?


आशिर्वाद.

🌹🌹🌹

No comments: