🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १५१
आपल्या फांद्या म्हणजे माझेपणाच्या आहेत. माझेपण सर्वत्र पसरलेले आहे. आपल्या फांद्याच तुटायला कठीण असतात.
माझी बायको, मुलें, संपत्ती, घरदार, वैभव सर्वत्र माझेपण आहे. इतकेच काय माझा मित्र, माझा शत्रू यातही माझेपण आहे.
राग, लोभ, द्वेष या सर्वात माझेपण आहेच. कारण सर्वत्र देहाचा संबंध आहे. सर्व संबंध देहातून आहेत.
वय झाल्यावर देहाला ठिगळे जोडून सांभाळणे जरूर आहे. देहाकडे वेगळेेपणाने बघायला शिकावे.
आपण आपल्या मुलाला आपलेपणाने पाहतो. त्याचप्रमाणे आपला देह आजारी असतांना आपल्या स्वत: कडे पहावे. तसा प्रयत्न करावा.
हे माझेपण पूर्णपणे गेले पाहिजे. ते जायला जगाकडे स्वार्थ सोडून पहायला शिकले पाहिजे.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment