🌸❗श्रीराम समर्थ❗🌸
अमृतधारा - १४१
प्रपंच व परमार्थ दोन्ही वेगळे वाटतात. पण ते तसे नाहीत. ते रुपयाच्या दोन बाजू आहेत.
रुपया घेण्यास दोन्ही बाजू घेतल्या पाहिजेत.
प्रपंच व परमार्थ जोडणे म्हणजे रुपया घेण्यासारखे आहे. सुखी जीवनाकरिता दोन्हीही आवश्यक आहेत.
प्रपंच आनंदमय करणे हा परमार्थ.
परमार्थ ही वृत्ति आहे. प्रपंच ही कृती आहे.
दोन्हीचा संयोग झाला की दोनपण उरत नाही. एकपण येते. तेथे आनंद असतो.
राम कर्ता ही भावना ठेवून त्याच्या स्मरणात प्रपंच करणे इतका परमार्थ सुरवातीला कळावा. यापेक्षा अधिक सांगेल तो वेदांत.
सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणात आहे.
आशिर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment