🌸❗श्रीराम समर्थ❗🌸
अमृतधारा - १४०
महद भाग्याची गोष्ट म्हणजे "सत्संगती". ती मिळणे कठीण. पण ती टिकवणे फार कठीण.
दोघांची आवड जर एक असेल तर संगत जमते.
संताना ज्याची गोडी (नामाची- भगवंताची), ते आम्हाला वावडे आहे व आम्हाला जे आवडते (विषय) ते त्यांनी टाकून दिलेले असते.
ते विषसमान आहे, तेच आम्हाला आवडते.
पण ते आम्हाला संत कसे देतील?
विष देऊन मारण्यापेक्षा, मरणाने (नैसर्गिक) मरू दिलेले बरे म्हणून ते तसे करीत नाही.
ज्या गोष्टी अपायकारक (विषयभोग) आहेत त्या जास्त घेऊन दुःखाचा विसर पाडणे हा त्यावर उपाय नाही.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment