🌸❗श्रीराम समर्थ❗🌸
अमृतधारा - १३९
माझे मला जितके कळले तितके खरे. विकारांच्या मालकीने वागले तर मनुष्यत्व आहे.
विकारांचे दास्यत्व हे पशूचे लक्षण आहे. आपल्या अंगी विषय फार मुरले गेले आहे.
दोष फार खोल गेल्याने भगवंताचे प्रेम वाढत नाही.
दोष मुरले म्हणजे वेगळेपणा दिसत नाही व दिसलेच तरी ते गुणच आहे असे दाखवितो.
म्हणून अत्यंत सावधगिरीने राहिले पाहिजे.
विकारांचा दास झालो तर देहाने कोण आहे, हे किंमतीचे नाही.
विकारांचा मालक, माझा मी मालक झालो - तर खरा (हे साधण्यासाठी नामाचा निरंतर अभ्यास ठेवणे जरुरी).
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment