26 Feb 2025

 🌸❗श्रीराम समर्थ❗🌸


    अमृतधारा - १३८


सहज मिळाले म्हणजे त्याची किंमत कळत नाही.


काही गोष्टी प्रयत्न-साध्य नाहीत. त्या भाग्याने येतात.


मनुष्य जन्म तसा आहे. इतर योनीतून मनुष्य जन्म येणे हातचे नाही.


मनुष्य जन्मात चांगला समज म्हणजे मी कशाकरिता आहे व कर्तव्याची जाणीव असणे हा आहे. तसे न वागणे पशुचे लक्षण आहे.


जन्म व शेवट (मृत्यु) आपल्या हातात नाही. पण मधला काळ आपल्या हातात आहे. तर आत्ता, आजच निश्चय करावा आणि भगवंताच्या चरणीं लागावे.


तुम्ही आज जे करता तेच करा पण ते मी भगवंताच्या इच्छेने करतो असे म्हणा. मी, माझे सर्व रामाचे आहे असे म्हणा. 


मनुष्य म्हणून जन्माला आलेला माणुस "माणुस" म्हणून मेला तरच खरा (हे नामस्मरणाने साध्य होते).


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: