4 Mar 2025

 🌸❗श्रीराम समर्थ❗🌸

        

   अमृतधारा - १४२


परमार्थ अगदी समजून करण्याचा व वागण्याचा आहे.


नाम सोडू नये व कुपथ्य करू नये. ते केले तर परिणाम कसा होईल? कुपथ्य म्हणजे अति स्वार्थीपणाने वागणे होय.


म्हणून अती स्वार्थी बनू नका.


माझा मी मोठा शत्रू आहे. शिवाय इतर विकार शत्रू आहेतच. 


म्हणून अति सावधपणे वागावे. प्रकृती सांभाळावी औषधाने आणि वृत्ती सांभाळावी नामाने. 


आपल्याला आतून कळल्याशिवाय दुसर्‍याचे खरे वाटत नाही. आतून कळण्यासाठी नाम घ्यावे.


आपल्यात शक्ति आहेच. ती फक्त वळवायची आहे. त्यात नाम घातले म्हणजे झाले.


नामाविरुद्ध ब्रह्मदेवाचे सुद्धा ऐकू नका.


आशिर्वाद.

🌹🌹🌹

No comments: