9 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


   अमृतधारा -१२१


सर्वांशी प्रेमाने वागावे. प्रेमाशिवाय भगवंत भेटणार नाही. 


नवर्‍याशिवाय सौभाग्यवती नाही, तसे प्रेमाशिवाय भगवंत नाही. 


लहानांजवळ मुलासारखे वागावे. बरोबरीच्याजवळ प्रेमाने मित्रत्वाने वागावे. 


म्हाता-यां (वयस्कां) जवळ आदराने व आपलेपणाने वागावे. हे आपल्या स्वाधीन आहे ते करावे. 


आपला परमार्थ बोलका नको, कृतीचा असू द्या. 


पैशाचे नुकसान हे मंदिराचे नुकसान नाही. प्रेमाचे नुकसान हे मंदिराचे नुकसान आहे. आपण प्रेम सांभाळावे.


आपण हवेसे वाटतो तोपर्यंत (त्या ठिकाणी) राहावे. नकोसे वाटायला लागल्यावर राहण्यात अर्थ नाही. 


ज्या वागण्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो असे वागू नये. 


आशीर्वाद .

No comments: