10 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


   अमृतधारा - १२२


देवळाचे कल्याण कोणीही करील, आपले कल्याण कोण करील? ते आपणच करून घेतले पाहिजे. 


आपण समाधान राखावे. समाधानाला काही लागत नाही. 


असमाधान कशानेही होते, समाधानाला काही लागत नाही (स्थिर चित्तामुळे असलेली ती शांत मनाची अवस्था आहे).


भगवंताचे स्मरण ठेवावे, पुढे काय होईल ते पहावे. 


भगवंताच्या इच्छेने परिस्थिती येईल तसे वागावे. 


नाना संकटांना तोंड देणे कसे ते रामाच्या चरित्रात दिसते. 


रामाच्या आश्रयाने तो राहील  त्याच आश्रयाने आपण राहू. 


रामाच्या उपासनेला पैसा नको. आपल्याकडे अनायासे उपासना आली आहे. ती चालवावी. रामाला आवडेल असे वागावे.


नाम हे परिपूर्ण आहे. त्याला कशाची जोड लागत नाही. 


आशीर्वाद.

No comments: