4 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - ११५


आपल्याला भगवंताचे प्रेम नाही हे खरे आहे. ते प्रेम निर्माण केले पाहिजे. भगवंताच्या प्रेमाला इतर काही लागत नाही.


मनात भगवंताचे प्रेम नसले तरी, देहाने म्हणजे त्याची बाहेरून पूजा अर्चा करावी. नामस्मरण करावे. पहिल्याने नाम बळ जबरीने घ्यावे लागेल. पण सवयीने तोंडात बसेल. मग याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. 


भगवंताला "निस्वार्थीपणाने" आपलासा करावा. परमात्म्याजवळ  "निस्वार्थीपणा" चे नाते आहे. "स्वार्थीपणाचे" नाही. 


प्रेमाने स्मरण येईल. आज प्रेम नाही म्हणून स्मरण येत नाही. पण म्हणूनच स्मरणाने प्रेम वाढवू. त्यात स्मरण ही कृती राहील, तिने प्रेम येइल.


आपण जगातल्या वस्तुवर प्रेम केले तर देहबुद्धी वाढते. पण भगवंतावर प्रेम केले तर देहबुद्धी कमी होते.


भगवंताजवळ काय मागावे? "तुझे प्रेम मला लागू दे" हेच मागावे. 


आशीर्वाद

No comments: