4 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - ११६


संकटाशिवाय प्रपंच नाही. आपल्या घरात भगवंत आहे, ही जाणीव ठेवावी. त्याने (अस्तित्वाच्या जाणीवेने) पाहिजे ते मिळणार नाही. तरी घरात भगवंत आहे ह्या भावनेने काळजी, भय, दुःख वाटणार नाही.


आपल्या प्रपंचात जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना ठेवावी. संकट आले तरी काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टी असावी. 


भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची जास्त जास्त अनुभवास येत चालली की परमार्थामधे आपली प्रगती होत आहे असे समजावे. 


जे जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थामधील पहिली पायरी होय.


आपल्याला गाढ झोपेतून हात धरून कोणी उठविले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे. भावना इतकी तयार झाली पाहिजे. 


आशीर्वाद.

No comments: