💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - ११७
माणूस लहानाचा मोठा होतो व त्याचा म्हातारा होतो. पण माणसात फारसा फरक पडत नाही.
म्हातारपणी मी कसाही असो तरी माझे ऐकावे असे वाटते.
ते दुःखाचे मूळ आहे. माझे लोकांनी कां ऐकावे? मी लोकांचे कां ऐकू नये ?
मला बरोबर (सर्व) माहिती आहे असे कोठे आहे.
म्हातारपणी आपले ऐकले नाही तर मनावर परिणाम होतो.
पुष्कळांना भ्रम होतो. तो होऊ देता उपयोगी नाही.
1) मनावर परिणाम होऊ न देणे हाच परमार्थ.
2) शरीरावर परिणाम होऊ न देणे हा प्रपंच.
दुसरे स्वाधीन नाही तरीही सर्व प्रयत्न आपण त्याकरिता करतो.
पहिले स्वाधीन आहे तरी त्यासाठी आपण काही करीत नाही.
एकूण दोन्हीकडून प्राप्ती नाही.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment