6 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - ११८


मनुष्याने गोंधळता उपयोगी नाही. लोक गोंधळून टाकतात . त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा निर्णय (होत) नाही. परमार्थात हे निरनिराळे लोक काहीतरी सांगतात. 


गोंधळाचे कारण नाही. पण ज्यांना अनुभव नाही तेच गोंधळ करतात. आपले एक साध्य व त्याला अनुकूल साधन असावे. ते साधन आपल्या स्वाधीन असावे. 


आपले साध्य - आनंद, शांती व समाधान आहे आणि त्यात मुख्य  आनंद आहे. साधन चालू असता आपल्या स्वतःच्या विस्मरणात आनंद आहे.


साधूने आपले समाधान कितीही लपविले तरी ते बाहेर दिसल्यावाचून राहणार नाही. त्याने प्रपंच केला तर त्याच्या प्रपंचामध्ये फरक दिसेलच दिसेल. त्याच्या नात्याचे नव्हेत, जातीचे नव्हेत असे लोकच त्याच्याजवळ दिसतील.


ज्याचे भगवंताचे अनुसंधान अखंड टिकले त्याचे खाणेपिणे, उठणे-बसणे वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात. 


आशीर्वाद

No comments: